19.4 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeराष्ट्रीयअत्याचार, विश्वासघाताचे दुसरे नाव म्हणजे टीएमसी

अत्याचार, विश्वासघाताचे दुसरे नाव म्हणजे टीएमसी

कृष्णनगर : लोकसभा निवडणुकीपूर्वी बंगाल दौ-यावर आलेल्या पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. कृष्णनगरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की टीएमसी हे अत्याचाराचे दुसरे नाव आहे.

टीएमसी म्हणजे विश्वासघात, भ्रष्टाचार आणि घराणेशाही. टीएमसीने गरिबांची लूट केली आहे. ममता बॅनर्जींच्या टीएमसीला लोकांना गरीब ठेवायचे आहे. त्यामुळे पश्चिम बंगालचा विकास होणे आवश्यक आहे. मोदींनी पश्चिम बंगालला पहिले एम्स दिले आहे. जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी म्हणाले की, ही भूमी भगवान कृष्णाच्या भक्तीचे सर्वोच्च प्रचारक चैतन्य महाप्रभू यांची जन्मभूमी आहे. चैतन्य महाप्रभूंच्या चरणी नतमस्तक होतो. हे माझे सौभाग्य आहे की काही दिवसांपूर्वीच मला समुद्राच्या खोल पाण्यात जाऊन भगवान श्रीकृष्णाच्या प्राचीन भूमीला, भगवान श्रीकृष्णाने स्थापन केलेल्या द्वारका नगरीला नमन करण्याचे भाग्य लाभले. बंगालमध्ये ज्या प्रकारे टीएमसी सरकार चालवत आहे, त्यामुळे बंगालची निराशा झाली आहे.

पश्चिम बंगालच्या जनतेने मोठ्या अपेक्षेने टीएमसीला एवढा मोठा जनादेश वारंवार दिला आहे, पण टीएमसी हे अत्याचार आणि विश्वासघाताचे दुसरे नाव झाले आहे. तृणमूल काँग्रेससाठी बंगालचा विकास नसून भ्रष्टाचार आणि घराणेशाहीला प्राधान्य आहे असे मोदींनी म्हटले आहे. सभेला संबोधित करण्यापूर्वी त्यांनी एका सरकारी कार्यक्रमादरम्यान पश्चिम बंगालमध्ये १५,००० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR