सोलापूर : सोलापूर शहरालगत मुळेगाव रोड परिसरातील सरवदे नगरात राहणार्या स्नेहा संतोष चिल्लाळ(वय२८) संध्या संतोष चिल्लाळ यांनी (वय११) मनोजकुमार संतोष चिल्लाळ(वय ७) या दोन मुलांसह साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्त्या केली.
आत्महत्त्येचे कारण अद्याप कळले नसून एमआयडीसी पोलीस घटनेचा अधीक तपास करत आहेत.तीहेरी आत्महत्त्यांमुळे सरवदे नगर परिसरात खळबळ उडाली असून नागरीकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.विवाहीतेने आपल्या दोन मुलांसह मृत्युला कवटाळल्यामुळे सरवदे नगर परिसर हादरून गेला आहे.