24.5 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeराष्ट्रीयभाजपचे नमो अ‍ॅपद्वारे देणगी अभियान सुरू

भाजपचे नमो अ‍ॅपद्वारे देणगी अभियान सुरू

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने काल १६ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील १९५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यानंतर आता पक्षाने देणगी अभियानाला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो अ‍ॅपद्वारे देणगीला सुरुवात केली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने त्यांच्या नमो अ‍ॅपद्वारे देणगी अभिया
सुरू केले आहे. याद्वारे भाजप समर्थक आपल्या मनाने पक्षाला देणगी देऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील नमो अ‍ॅपद्वारे त्यांच्या पक्षाला (भाजप) २००० रुपयांची देणगी दिली. पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन ही माहिती दिली आणि देणगी दिलेला स्क्रीनशॉटही शेअर केला.
या फोटोसोबत पंतप्रधान मोदींनी सर्वसामान्यांना पैसे दान करण्याचे आवाहनही केले. ते म्हणाले मला पक्षासाठी योगदान देण्यात आनंद होत आहे. विकसित भारत घडवण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळ द्या. नमो अ‍ॅपद्वारे देणगी देऊन भारताच्या उभारणीत सहभागी होण्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR