27.1 C
Latur
Wednesday, December 25, 2024
Homeसोलापूरमाढा लोकसभा मतदारसंघावर अजितदादा गटाचा दावा

माढा लोकसभा मतदारसंघावर अजितदादा गटाचा दावा

पंढरपूर : माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे (अजितदादा गट) तीन आमदार आहेत. यामुळे माढा लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळावी, असा दावा पंढरपुरात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे.

पंढरपुरात माढा लोकसभा मतदारसंघातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत माजी मंत्री रामराजे निंबाळकर, संजीवराजे निंबाळकर, दीपक आबा साळुंखे-पाटील, कल्याणराव काळे, रणजितसिंह शिंदे यांच्यासह माढा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत यापूर्वी हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. त्याचे प्रतिनिधित्व तत्कालीन अध्यक्ष शरद पवार, विजयसिंह मोहिते-पाटील यांनी केले आहे.

शिवाय या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मानणारा मोठा वर्ग आहे. आमचे तीन आमदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ आम्हालाच मिळाला पाहिजे, अशी भूमिका सर्वच उपस्थित नेत्यांनी मांडली. मात्र उमेदवार कोण हे जाहीर केले नाही.मतदारसंघातील नेत्यांचे एकमत झाल्यानंतर हा प्रस्ताव ६ मार्चला मुंबईत होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत मांडण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र कोणत्याही परिस्थितीत ही जागा आम्हालाच मिळाली पाहिजे, असे रामराजे निंबाळकर यांनी सांगितले.

माढा लोकसभेवर अजित पवार गटाने दावा ठोकलेला असताना शरद पवार गट ही उमेदवाराची चाचपणी करत आहे. यावर शरद पवार यांच्या पक्षाचे आव्हान वाटत नाही. असे म्हणत आमचा पक्ष आता वेगळा झाला आहे, आमच्या वाटाही आता वेगळ्या आहेत. ते काय निर्णय घेतात तो त्यांचा विषय आहे. आम्हाला सध्या त्यांचे आव्हान वाटत नसल्याचे रामराजे निंबाळकर यांनी सांगितले. माढा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद अधिक आहे. यामुळे ही जागा आपल्याकडे घ्यावी, अशी मागणी अजित पवार यांच्याकडे करणार आहोत. आमच्यामध्ये बंडखोरी होणार नाही. पक्ष जो उमेदवार ठरवेल त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.असे आमदार रामराजे निंबाळकर यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR