27.3 C
Latur
Tuesday, December 24, 2024
Homeमहाराष्ट्रराहुल नार्वेकर यांचा ईमेल हॅक

राहुल नार्वेकर यांचा ईमेल हॅक

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ईमेल आयडी हॅक करून राज्यपालांना मेल पाठवण्यात आला आहे. त्या मेलमध्ये आमदारांवर कारवाई करण्याचे म्हटले आहे. या हॅकिंग प्रकारामुळे विधानसभा अध्यक्षांच्या सायबर सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित झाला आहे.

या प्रकरणी आता मुंबईतील मरीन लाईन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक करून राज्यपाल रमेश बैस यांना मेल करण्यात आला. त्या मेलमध्ये आमदार सभागृहात नीट वागत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
ईमेल हॅक झाल्याची बाब विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सोमवारी दुपारी चार वाजता लक्षात आली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी मुंबईतील मरीन लाईन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. विधानसभा अध्यक्षांची सायबर सुरक्षा तोडणा-यांचा शोध पोलिस घेत आहेत. त्याचवेळी विधिमंडळाची सायबर सुरक्षा अधिक चांगली करण्याचे काम प्रशासनाला करावे लागणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR