22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeआरोग्यमहिलांनो योग्य उपचाराने मुळव्याधला करू शकता बाय बाय

महिलांनो योग्य उपचाराने मुळव्याधला करू शकता बाय बाय

परभणी/ सुधीर गो. बोर्डे : धावपळीचे जीवन, फास्ट फुडचे मोठ्या प्रमाणात सेवन व व्यायामाच्या अभावामुळे सध्याच्या काळात अनेकांना मुळव्याध आजाराने ग्रासले आहे. विशेषत: महिलांना हा आजार झाल्यानंतर अवघड जागेच दुखण सांगता येईना, बोलता येईना अशी अवघड परिस्थिती महिलांची होते. त्यामुळे महिला हा आजार लपवून ठेवतात किंवा खासगी उपचार घेतात. परंतू यामुळे हा आजार आणखीनच बळावतो. परंतू मुळव्याध आजारावर तज्ञ डॉक्टरांचा वेळीच सल्ला घेतल्यास हा आजार पूर्णत: बरा होवून महिला आपले आयुष्य पुर्विप्रमाणे आनंदात जगू शकतात असे मत परभणी शहरातील प्रसिध्द मुळव्याध व योग तज्ज्ञ डॉ. अंजली आनंद कुलकर्णी (उंडेगावकर) यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बोलताना व्यक्त केले आहे.

डॉ. अंजली कुलकर्णी (उंडेगावकर) या स्वास्थ्य उंडेगावकर हॉस्पिटल, मुळव्याध लेसर सेंटर परभणीच्या संचालक आहेत. या हॉस्पिटलच्या माध्यमातून मागील १८ वर्षांपासून त्या मुळव्याध आजाराबद्दल आकाशवाणी, वर्तमानपत्र व आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. याशिवाय आयुर्वेद व्यासपीठाच्या माजी सचिव म्हणूनही त्यांनी आरोग्य विषयक जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. या सर्व कार्याची दखल घेवून स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेतर्फे अतिशय प्रतिष्ठेचा समजल्या जाणा-या वैद्यकीय रत्न पुरस्काराने डॉ. अंजली कुलकर्णी (उंडेगावकर) यांना सन्मानित करण्यात आले आहे.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पुढे बोलताना डॉ. अंजली कुलकर्णी (उंडेगावकर) म्हणाल्या की, मुळव्याध या आजाराबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. विशेषत: महिलांना जेव्हा हा आजार होतो तेंव्हा कुटुंबातील दैनंदिन कामकाज पार पाडताना महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच मुळव्याधमुळे होणा-या प्रचंड त्रासामुळे शारीरिक व मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागते. परंतू महिला हा आजार लपवून ठेवून खासगी औषधोपचार घेतात. खासगी औषधोपचार करणा-यांना मुळव्याध आजाराबद्दल कुठलेही ज्ञान नसल्याने अनेकवेळा रूग्णांची फसवूणक होण्याची शक्यता असते. त्यामुळे महिलांनी हा आजार लपवून न ठेवता वेळीच मुळव्याध तज्ञांकडून उपचार करून घ्यावेत. तसेच मुळव्याध म्हणजे काय व ती होण्याची कारणे कोणती याबद्दलही त्यांनी विस्तृत माहिती दिली.

मुळव्याध म्हणजे काय?
शरीराच्या मुळाशी होणारा आजार असल्याने याला मुळव्याध असे म्हणतात. मनुष्याच्या गुदाजवळ रक्तवाहिन्या एकत्र आलेल्या असतात. त्याच्यावर मलबध्दता व अन्य कारणांमुळे जोर वाढल्यामुळे अनेक लहान रक्त वाहिन्यांचे जाळे तयार होवून मुळव्याधीचे कोंब तयार होतात.

मुळव्याध होण्याची कारणे कोणती?
मलबध्दता हे मुळव्याधचे सर्वात महत्वाचे कारण आहे. तसेच गरोदर महिला, गर्भाशयाचे अर्बुद, सकस आहाराचा अभाव, अधिक काळ उभा राहून काम केल्यामुळे रक्त वाहिन्यावरील जोर वाढून मुळव्याध होऊ शकते.

मुळव्याधची लक्षणे कोणती?
गुदद्वाराजवळ खाज, आग, जळजळ होणे. शौचाच्या वेळी रक्तस्त्राव होणे. मुळव्याधच्या वाढलेल्या अवस्थेत कोंब बाहेर आल्यासारखा वाटतो.

मुळव्याध उपचार पध्दती : महिलांमध्ये मुळव्याध या आजाराविषयी जनजागृती करणे महत्वाचे आहे. तज्ञ डॉक्टरांकडून योग्य औषधोपचार, पथ्य पालन यामुळे मुळव्याध हा आजार पूर्णपणे बरा होतो. परंतू यासाठी महिलांनी सुरूवातीच्या अवस्थेतच न लाजता तज्ञ डॉक्टरांकडे जावून यावर औषधोपचार घेणे महत्वाचे असते. मुळव्याध आजारावर पुढील पध्दतीने उपचार करता येतात.
१) इंजेक्शन (स्क्लेरोथेरपी) उपचार : हे उपचार मुळव्याधच्या पहिल्या व दुस-या अवस्थेत दिले जातात. यामुळे रक्तस्त्राव कमी होण्यास मदत होते. पण कोंब मोठे असतील तर तिस-या व चौथ्या अवस्थेत इंजेक्शनचा फारसा उपयोग होत नाही.
२) लेसर उपचार : मुळव्याध उपचाराची ही आधुनिक पध्दत आहे. या उपचार पध्दतीत रूग्णास त्रास कमी होतो, जखमी कमी राहते व रूग्णास जास्त दिवस दवाखाण्यात भरती होण्याची गरज नसते. रूग्ण व डॉक्टर दोघांच्या दृष्टीने ही उपचार पध्दती सोयीस्कर असून रूग्ण तुलनेने कामावर लवकर रूजू होऊ शकतो.

३) व्हेसल सिलर : यामध्ये मोठमोठे मुळव्याधचे कोंब यंत्राद्वारे बिनाटाक्याने काढता येतात. जखम कमी राहते. ती टाक्याने शिवायची गरज नसते. विशेष म्हणजे यात रक्तस्त्राव होत नाही.
४) रेडीओ फ्रिक्वेन्सी : मुळव्याध व भगंदर या दोन्ही आजारात ही उपचार पध्दती अतिशय उपयोगी आहे. ही अत्याधुनिक मशीन असल्यामुळे यामुळे आजार पुन्हा होण्याची शक्यता खूप कमी असते.
५) क्षारसूत्र चिकित्सा : ही प्राचीन आयुर्वेद चिकीत्सा पध्दती आहे. यामुळे शौचाच्या जागेचा ताबा जाण्याची भिती नसते. ही पध्दत मुळव्याधच्या २, ३ व ४थ्या अवस्थेत वापरण्यात येते.

कोणताही रूग्ण मुळव्याध या आजारापासून पुर्णपणे बरा होऊ शकतो. यासाठी तज्ञ डॉक्टर व योग्य औषधोपचारांची गरज असते. याशिवाय डॉक्टरांनी सांगितलेल्या संपूर्ण सुचनांचे पालन केल्यास मुळव्याध आजारातून पूर्णत: बरे होवून रूग्ण पूर्वी प्रमाणे नॉर्मल आयुष्य जगू शकतो. त्यामुळे मुळव्याध आजार लपवून न ठेवता तज्ञ डॉक्टरांच्या सल्लयाने योग्य ते औषधोपचार घेतल्यास मुळव्याध आजाराला आपण बाय बाय करू शकतो असे आवाहन जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मुळव्याध व योग तज्ञ डॉ. अंजली कुलकर्णी (उंडेगावकर) यांनी महिलांना केले आहे.

डॉ. अंजली आनंद कुलकर्णी (उंडेगावकर)
(मुळव्याध व योग तज्ञ)
संचालक स्वास्थ्य उंडेगावकर हॉस्पिटल, मुळव्याध लेसर सेंटर,
उंडेगावकर कॉम्प्लेक्स, बसस्थानक रोड, परभणी.
मो.नं. ७६६६८४४३४३, ७४१०७३८०४४, ९८२३०९००२२

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR