यवतमाळ : यवतमाळच्या आर्णी येथील सराफ व्यापा-यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून बंदुकीच्या धाकावर लुटणा-या टोळीला अखेर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
यवतमाळच्या आर्णी येथील सराफ व्यापा-यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून बंदुकीच्या धाकावर लुटणा-या टोळीला अखेर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. यवतमाळ पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा पथक आणि आर्णी पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत या लूटमार करणा-या टोळीला उमरखेड येथून अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयित आरोपीसह त्यांच्याकडील २५ लाख ९२ हजार रुपयाचा मुद्देमालही जप्त केला आहे. पोलिसांनी मिळलेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत यातील संशयित आरोपी शेख अफसर शेख शरीक याला पोलिसांनी अटक केली.
चौकशी दरम्यान त्यांच्या सोबत त्याचे इतर साथीदार असल्याचे देखील उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी इतरांचा शोध घेतला असता, शेख निसार शेख उस्मान, फैय्याज खान बिसमिल्ला खान, शेख जमीर शेख फैमोद्दीन (सर्व रा. उमरखेड) यांना अटक करण्यात आली आहे. तर यातील आणखी एक संशयित आरोपी शाकीब खॉं अय्युब खॉं हा फरार आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून यात आणखी काही गुन्हे उघड होण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे.
२७ लाखांचा मुद्देमाल केला होता लंपास
कार सावळी रोडवरील विटाची भट्टी ते कु-हा फाट्यादरम्यान आली असताना काही ४ ते ५ आज्ञातांनी त्यांची टाटा नेक्सान कंपनीची कार (कार क्र. एमएच २९ बीव्ही ७१२८) अडवली. त्यांनतर या व्यक्तीनी कारच्या काचा फोडून त्यातील रक्कम आणि दाग दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र विशाल आणि रंजितने त्यांना विरोध केला असता त्यातील एकाने विशाला बंदुकीचा धाक दाखवला, तेवढ्यात दुस-याने या दोघांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. भर रस्त्यात सिनेस्टाईल पद्धतीने सुरू असलेल्या या प्रकारात ४ ते ५ आज्ञातांनी कार मधील बॅग घेऊन पळ काढला होता. या बॅगेत १ लाख ८० हजाराची कॅश आणि ४०० ग्रॅम सोने, असा एकूण २७ लाखांचा मुद्देमाल या दरोडेखोरांनी लंपास केला होता.