31.6 C
Latur
Friday, May 9, 2025
Homeपरभणीमाझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात सावित्रीबाई फुले मुलींचे हायस्कूल द्वितीय

माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात सावित्रीबाई फुले मुलींचे हायस्कूल द्वितीय

परभणी : शाळांमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि सर्वांगीन विकास वृध्दींगत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबविण्यात आले होते. सर्व पात्रता गुणांकना नुसार येथील सावित्रीबाई फुले मुलींचे हायस्कूल शाळेने परभणी तालुक्यात व्दितिय क्रमांक प्राप्त केला आहे.
शाळेतील भव्य इमारत, क्रिडांगण, अद्ययावत प्रयोगशाळा, परिपुर्ण ग्रंथालय, संगणक प्रशिक्षण वर्ग यासह परसबाग, अमृत कलश अभियान सहभाग, स्वच्छता मॉनिटर, साक्षरता अभियान, विद्याथीर्नी संसद, माजी विद्यार्थीनी मेळावा, प्लास्टिक मुक्त शाळा, बोलक्या भिंती, क्रांतीज्योती महोत्सव, पथनाट्य या माध्यमातुन सातत्यपुर्ण ऊपक्रमशिलता शाळेनी प्रस्थापित केली आहे. शाळेच्या या यशा बद्दल विद्या निकेतन संस्थेच्या अध्यक्षा मेघाताई देशमुख, सचिव अ‍ॅड.दिपकराव देशमुख, संचालक मंडळ, मुख्याध्यापिका जया जाधव, सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR