30.3 C
Latur
Friday, March 14, 2025
Homeमहाराष्ट्रहायप्रोफाईल वस्तीत घरात घुसला कोब्रा 

हायप्रोफाईल वस्तीत घरात घुसला कोब्रा 

मुंबई : बदलत्या हवामानामुळे विषारी आणि बिनविषारी साप भक्ष्यासह थंड जागेचा शोध घेतात. यावेळी अनेकवेळा साप सरळ मानवी वस्तीत शिरतात. यासंदर्भातील घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईजवळील कल्याणमध्ये हायप्रोफाईल भागातील वस्तीत एका बंगल्यामध्ये विषारी असलेला कोब्रा नाग घुसला. घरात कोब्रा आल्याची चाहूल लगताच घरातील पाळीव कुत्रा सावध झाला. त्याने आपल्या मालकाच्या कुटुंबावर आलेले संकट ओळखले. त्यानंतर कोब्रा आणि श्वानाची झुंज सुरू झाली. अखेर या झुंजीत कुत्र्याचा मृत्यू झाला. तोपर्यंत सर्पमित्रास बोलवण्यात आले होते. सर्पमित्राने नागाला पकडून जंगलात सोडले.

कल्याण पश्चिमेकडील गोदरेज हिल या हायप्रोफाईल परिसरात स्वप्ननगरी येथे मॅथ्यूज यांचा बंगला आहे. या बंगल्यात मॅथ्यूज यांच्या कुटुंबासह डॉबरमन जातीचा पाळीव कुत्रा गेल्या दोन वर्षांपासून राहत आहे. या कुत्र्यावर मॅथ्यूज कुटुंब आपल्या घरातील एक सदस्य असल्यासारखे त्याचे पालनपोषण करत. शुक्रवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास मॅथ्यूज यांच्या बंगल्यात चार फुटाचा कोब्रा नाग शिरला. नागाला पाहून कुत्रा आक्रमक झाला. त्याने कोब्रा बंगल्यात येण्यास जोरदार प्रतिबंध केला. दोघांची झुंज झाली. मात्र बांधलेला असल्याने कुत्र्याचे प्रयत्न निष्फळ ठरले.

कुटुंबातील सदस्यांनी सर्पमित्रास बोलवले
नागाचे विष शरीरात भिनल्यानंतर कुत्र्याचा जागीच तडफडून मृत्यू झाला. तोपर्यंत सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी बंगल्यात फणा काढून बसलेल्या सापाला शिताफीने पकडून पिशवीत बंद केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR