29.9 C
Latur
Saturday, May 17, 2025
Homeउद्योगदेशात होणार १०० बिलियन डॉलर्सची गुंतवणूक

देशात होणार १०० बिलियन डॉलर्सची गुंतवणूक

१० लाख रोजगार निर्मितीही होणार इफ्टा ग्रुपसोबत भारताने केला मुक्त व्यापार करार

नवी दिल्ली : भारताने आज चार युरोपीय देशांच्या इफ्टा या समुहासोबत एका मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली. यामुळे या देशांसोबत वस्तू, सेवा आणि गुंतवणुकीच्या परस्पर व्यापाराला चालना मिळणार आहे. या करारासाठी सात मार्च रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजूरी मिळाली होती. अखेर आज, यावर अधिकृत स्वाक्षरी झाली.

इफ्टा समूहात आईसलँड, लाईकेस्टाईन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड या देशांचा समावेश होतो. या चारही देशांशी आता भारत अगदी आरामात व्यापारी गुंतवणूक वाढवू शकणार आहे. याबाबतच्या बैठकीचे नेतृत्त्व भारतातर्फे पीयूष गोयल यांनी केले. इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, या करारातून पहिल्या दहा वर्षांमध्ये भारतात ५० बिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीचे वचन भारताला मिळालेले आहे. तर त्यापुढील पाच वर्षांमध्ये आणखी ५० बिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीचा विश्वास व्यक्त करण्यात येतो आहे.

१० लाख रोजगार
या करारामध्ये १४ भाग आहेत. यामध्ये वस्तू व्यापार, रुल्स ऑफ ओरिजिन, सेवा व्यापार, गुंतवणूक चालना आणि परस्पर सहकार्य, सरकारी खरेदी, बौद्धिक संपदा हक्क, व्यापारातील तांत्रिक अडथळे आणि व्यापार सुलभता अशा गोष्टींचा समावेश होतो. यामुळे भारतात १० लाख रोजगार निर्माण होणार असल्याचा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.

ऐतिहासिक करार
हा एफटीए अगदी संतुलित, निष्पक्ष आणि न्याय्य आहे. फॉरेन ट्रेड कराराच्या इतिहासात कधीही असा करार झालेला नाही. भारतीय उद्योगांना सर्वोत्तम तंत्रज्ञान मिळवण्यासाठी आणि भारतात नाविन्य आणण्यासाठी एफटीए म्हणून १०० बिलियन डॉलर्सची प्रचंड गुंतवणूक मिळवण्याची संधी यातून उपलब्ध झाली आहे. यातून थेट १० लाख नोक-या निर्माण होत आहेत असे पीयूष गोयल म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR