22.9 C
Latur
Monday, December 30, 2024
Homeराष्ट्रीयउच्च न्यायालयातील तीन मुख्य न्यायाधीशांची पदोन्नती

उच्च न्यायालयातील तीन मुख्य न्यायाधीशांची पदोन्नती

नवी दिल्ली : कायदा मंत्रालयाने तीन राज्यांच्या उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. यासह, देशातील सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची सर्व ३४ पदे भरली जातील. म्हणजे तीन न्यायमूर्तींच्या शपथविधीनंतर सर्वोच्च न्यायालय पूर्ण क्षमतेने काम करेल. उच्च न्यायालयाच्या तीन मुख्य न्यायाधीशांना गुरुवारी पदोन्नती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील एकूण न्यायाधीशांची संख्या ३४ झाली आहे.

कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टमध्ये न्यायाधीशांच्या नियुक्तीची घोषणा केली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने या न्यायमूर्तींच्या नावांची शिफारस नोव्हेंबर २०१६ मध्ये केली होती. ज्या राज्यांच्या न्यायाधीशांना बढती देण्यात आली आहे त्यात दिल्ली, राजस्थान आणि गुवाहाटी उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांचा समावेश आहे. मेघवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सतीश चंद्र शर्मा, राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ऑगस्टीन जॉर्ज मसिह आणि गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संदीप मेहता यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR