31 C
Latur
Wednesday, May 22, 2024
Homeमनोरंजनदिवाळीत प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी

दिवाळीत प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी

मुंबई : सिनेप्रेक्षकांसाठी यंदाची दिवाळी खूपच खास असणार आहे. दिवाळीत एकीकडे ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या धाटणीचे, विविध विषयांवर भाष्य करणारे सिनेमे प्रदर्शित होत आहेत. तर दुसरीकडे सिनेमागृहातही अनेक सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.
दिवाळीत बॉक्स ऑफिसवर बिग बजेट सिनेमांची टक्कर होणार आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा ‘टायगर ३’ हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच मराठी सिनेमेही प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर ‘टायगर ३’ आणि ‘श्यामची आई’, ‘नाळ २’ आणि ‘झिम्मा २’ या सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.

‘टायगर ३’: १२ नोव्हेंबर २०२३
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा ‘टायगर ३’ हा सिनेमा १२ नोव्हेंबर २०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आता या सिनेमाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. सलमानचा ‘टायगर ३’ हा सिनेमा शाहरुखच्या ‘जवान’चा रेकॉर्ड ब्रेक करणार का हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘टायगर ३’ या सिनेमाची सिनेरसिक आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान खान आणि कतरिना कैफ या सिनेमात मुख्य भूमिमेक दिसणार आहेत. त्यांना पुन्हा एकत्र पाहणं ही प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे.

नाळ २ : १० नोव्हेंबर २०२३
नागराज मंजुळेंच्या ‘नाळ २’ या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. सुधाकर रेड्डी यंकट्टी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. या सिनेमातील चिमुकल्या चैत्याने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं असून दुस-या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. नाळ सिनेमाच्या माध्यमातून नागराज मंजुळेंनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं.

‘झिम्मा २’ : २४ नोव्हेंबर
‘टायगर ३’ प्रदर्शित झाल्यानंतर ‘झिम्मा २’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बहुचर्चित सिनेमाचीदेखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. ‘झिम्मा २’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा हेमंत ढोमेने सांभाळली आहे. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या या सिनेमात दमदार भूमिका आहेत. तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR