25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeअंतरराष्ट्रीयमुले जन्माला घाला आणि भरपूर पैसे कमवा!

मुले जन्माला घाला आणि भरपूर पैसे कमवा!

चिनमध्ये विचित्र योजनेमुळे जगभरात खळबळ २८ ते ४२ वयोगटातील महिलांना सरोगेट माता होण्याचे आवाहन

बीजिंग : मुले जन्माला घाला आणि भरपूर पैसे कमवा अशी विचित्र ऑफर चीनमधील एका कंपनीने महिलांना दिली आहे. यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, कंपनीने एक ऑनलाइन जाहिरात दिली आहे. ज्यामध्ये २८ ते ४२ वर्षे वयोगटातील महिलांना सरोगेट माता बनून लाखो कमावण्याची संधी देण्यात आली आहे. चीनमध्ये सरोगसी बेकायदेशीर असताना अशी परिस्थिती आहे. सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

रिपोर्टनुसार, देशात सरोगसी बेकायदेशीर असूनही कंपनी शिनजियांग आणि शांघायमध्ये बिनदिक्कतपणे हा व्यवसाय करत आहे. ग्राहकाच्या इच्छेनुसार, पैसे ठरवले जातात, असे कंपनीने स्थानिक माध्यमांना सांगितले. मात्र, या जाहिरातीमुळे सरकारी अधिका-यांची झोप उडाली असून तातडीने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान गतवर्षीच रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनीही देशातील महिलांना एक आवाहन केले होते की रशियन महिलांनी ७ ते ८ मुलांना जन्माला घालावे. त्यासाठी त्यांनी जुन्या काळातील दाखलाही दिला होता.. जुन्या काळात असे होते की आपली आजी आणि पणजी त्या काळात ७-८ मुलांपेक्षा अधिक मुलांना जन्माला घालायची. महिलांनी ही चांगली परंपरा पुन्हा सुरू केली पाहिजे असे व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले होते. मात्र, पाश्चात्य मीडियाचे म्हणणे काही औरच आहे. मॉस्कोमध्ये वर्ल्ड रशियन पिपल्स कौन्सिलचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. राष्ट्रपतींनी अचानक हे आवाहन केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या.

एका बाळासाठी २० लाखांची ऑफर
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, चीनच्या हेनान प्रांतातील हुचेन हाउसकीपिंग नावाच्या कंपनीने ही विचित्र जाहिरात दिली आहे. कंपनीच्या जाहिरातीनुसार, ज्यांचे वय २८ वर्षांपेक्षा कमी आहे त्यांना सरोगेट माता बनून ३५,००० यूएस डॉलर (म्हणजे २५ लाखांपेक्षा जास्त) कमावण्याची संधी आहे. याचप्रमाणे, कंपनीकडून २९ ते ३० वर्षे वयोगटातील महिलांना २,१०,००० युआन (जवळपास २५ लाख रुपये) देण्यात येतील. तसेच, ४० ते ४२ वर्षे वयोगटातील महिलांना या कामासाठी कंपनीने १,७०,००० युआन (२० लाख रुपये) देण्याची ऑफर दिली आहे.

कंपनीने म्हणणे काय?
या ऑफरद्वारे अनेक कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात येत आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे. चीनमध्ये सरोगसीवर बंदी असतानाही कायदेशीर त्रुटींचा फायदा घेत कंपनी देशात आपला व्यवसाय चालवत आहे. दुसरीकडे, सोशल मीडियावर जाहिरातींबद्दल लोक विविध चर्चा करत आहेत. यामुळे मानवी तस्करीला चालना मिळणार आहे, असे अनेकांचे मत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR