24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईतील ७ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव

मुंबईतील ७ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना खासदार आणि लोकसभा गटनेते राहुल शेवाळे यांनी मुंबईतील ब्रिटिशकालीन ७ रेल्वे स्थानकांची नाव बदलण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला असून उद्या होणा-या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळेल, असे आश्वासन आपल्याला मिळाले असल्याचे राहुल शेवाळे यांनी आज सांगितले.

शिवसेना खासदार आणि लोकसभा गटनेते राहुल शेवाळे यांनी मुंबईतील ब्रिटिशकालीन ७ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला होता. यासाठी शेवाळे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना, सरकारने आपला प्रस्ताव मान्य केला असून उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय होईल, असे सांगितले. करीरोड स्टेशनचं नाव बदलून लालबाग, सँडहर्स्टचं नाव डोंगरी, मरिनलाईन्सचं नाव मुंबादेवी, चर्नी रोडचं नाव गिरगाव, कॉटन ग्रीनचं नाव काळा चौकी, डॉकयार्ड रोडचं नाव माझगाव स्टेशन आणि किंग्ज सर्कलचं नाव तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्टेशन करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती शेवाळे यांनी दिली.

भारतीय पारतंत्र्यांच्या खुणा पुसून टाकण्यासाठी केंद्र सरकार पुढाकार घेत असताना मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावेदेखील बदलायला हवी, अशी मुंबईकरांची भावना होती म्हणून या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारच्या वतीने या प्रस्तावाला तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे. या मागणीनुसर राज्य सरकारकडून केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR