लातूर : प्रतिनिधी
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी आणि व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या मान्यवरांना लायन्स-२०२४ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांना उपस्थित राहण्याबाबत लायन्स क्लब ऑफ लातूर सिटी पदाधिका-यांनी बाभळगाव निवासस्थानी भेट घेऊन निमंत्रण दिले.
या पुरस्कार सोहळयाचे उद्घाटन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते व्हावे, यासाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. धर्मवीर भारती आणि संयोजक अनिल पुरी यांनी प्रत्यक्ष भेटून माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. हा पुरस्कार सोहळा दयानंद सभागृह येथे आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण त्यांनी स्वीकारले असून ते कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत.