सोलापूर : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करन यादव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात मुंबई विभागातील ३, नागपूर विभागातील ४, सोलापूर विभागातील२ आणि पुणे विभागातील १ अशा १० मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांचा संरक्षा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
कर्तव्यादरम्यान त्यांची सतर्कता, अनुचित घटना टाळण्यासाठी आणि मागील महिन्यांत रेल्वे वाहतुकीत सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हे पुरस्कार देण्यात आले. पदक, प्रशस्तीपत्र, उत्कृष्ट सुरक्षा कार्याचे प्रशस्तीपत्र आणि २०००/- रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दिपक कुमार, स्थानक व्यवस्थापक बीटीपीएन लोड लूप मार्गिकेवर येत असताना चाकाजवळ रिकामा/लोडेड डिव्हाइस रॉड लटकलेला दिसला. सी अँड डब्ल्यू उपस्थित असलेल्या सर्व संबंधितांना त्यांनी माहिती दिली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली.
शिवशंकर मोरे, इलेक्ट्रिकल सिग्नल मेंटेनर, मलिकपेठ दि. २७. ऑगस्ट२०२३ रोजी एस अँड टी गिअरच्या देखभालीदरम्यान पॉईंट क्रमांक १०३ बी चे लॉक स्लाइड तुटलेले आढळले. त्यांनी तत्काळ सर्व संबंधितांना माहिती दिली आणि पॉईंटचा कनेक्शन मेमो दिला. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली
.
महाव्यवस्थापकांनी आपल्या भाषणात पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कर्तव्याप्रती सतर्कता आणि समर्पणाबद्दल त्यांचे कौतुक केले. अशा प्रकारची सतर्कता आणि बांधिलकी इतरांना प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची प्रेरणा देईल, असे ते म्हणाले.
याप्रसंगी प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी एम. एस. उप्पल; प्रधान मुख्य परिचालन प्रबंधक एस. एस. गुप्ता; प्रधान मुख्य यांत्रिकी अभियंता सुनील कुमार; प्रधान मुख्य विद्युत अभियंता एन. पी. सिंह; तसेच मुख्य सिग्नल अभियंता पियुष कक्कड, मुख्य ट्रॅक अभियंता एस. एस. केडिया उपस्थित होते.