24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमुख्य बातम्यामानव विकास निर्देशांकात भारत एक पाऊल पुढे

मानव विकास निर्देशांकात भारत एक पाऊल पुढे

नवी दिल्ली : मानव विकास निर्देशांकात (एचडीआय) भारताची स्थिती अजूनही च्ािंताजनक आहे. या निर्देशांकात भारताच्या स्थानात अवघ्या एक क्रमांकाची प्रगती झाली. मात्र २०२१ मध्ये जगातील १९१ देशांपैकी १३५ व्या क्रमांकावर असलेला भारत २०२२ मध्ये १९३ देशांपैकी १३४ व्या क्रमांकावर आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रम (यूएनडीपी) अहवालात भारतासह सर्व देशांची यासंदर्भातील आकडेवारी उघड झाली आहे. भारताचा मानव विकास निर्देशांक २०२१ मधील ०.६३३ च्या तुलनेत २०२२ मध्ये ०.६४४ असा किंचित प्रमाणात सुधारला आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाचा ‘ब्रेकिंग द ग्रिडलॉक: रीइमेजिनिंग कोऑपरेशन इन ए पोलराइज्ड वर्ल्ड’ शीर्षकाचा हा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला. भारताने लैंगिक असमानता निर्देशांकातही सुधारणा केली.

मानव विकास निर्देशांकात भारताने एकाच स्थानाने प्रगती केली असली तरी लैंगिक असमानता निर्देशांकात मात्र १४ स्थानांनी प्रगती केली. ते २०२१ मध्ये १२२ वरून २०२२ मध्ये १०८ वर पोहोचले. जीआयआय प्रामुख्याने प्रजनन आरोग्य, सशक्तीकरण व श्रमिकांची बाजारपेठ या तीन घटकांवर मोजला जातो. भारताचा जीआयआय जागतिक सरासरी ०.४६२ च्या तुलनेत चांगला असून तो ०.४३७ इतका आहे.

देशात श्रमशक्तीच्या सहभाग दरात भारतातील दरी मोठी आहे. यात महिला (२८.३ टक्के) व पुरुष (७६.१ टक्के) या तब्बल ४७.८ टक्क्यांचे अंतर आहे. मानव विकास निर्देशांकात भारताचे स्थान एकाच क्रमांकाने सुधारले असले तरी १९९० पासून आतापर्यंत देशाने लक्षणीय प्रगती केली. १९९०च्या तुलनेत आयुर्मान ९.१ वर्षांनी वाढले आहे.

शालेय शिक्षणाची सरासरी वर्षे ३.८ वर्षांनी वाढली आहेत. त्यामुळे, १९९० ते २०२२ दरम्यान मानव विकासाच्या बाबतीत भारत मध्यम श्रेणीत आहे. भारताने २०२२ मध्ये आयुष्यमान, शिक्षण व दरडोई एकूण राष्ट्रीय उत्पन्न आदी सर्व मानव विकास निर्देशांकात सुधारणा नोंदविली. एकीकडे श्रीमंत देश विक्रमी मानव विकास करत असताना दुसरीकडे गरीब देशांतील निम्मे देश आपल्या प्रगतीच्या पूर्व-संकट स्तरापेक्षा खालील क्रमांकावर आहेत.

जगभरात असमानतेत वाढ
जगभरात असमानतेत सातत्याने वाढ होत असल्याचेही ‘यूएनडीपी’च्या अहवालात म्हटले आहे. सुमारे २० वर्षांच्या अभिसरणानंतर २०२० पासून श्रीमंत आणि गरीब देशांतील दरी वाढत आहे. वस्तूंच्या जागतिक व्यापारापैकी ४० टक्के व्यापार तीन किंवा त्यापेक्षाही कमी देशांत होतो, याकडेही अहवालात लक्ष वेधले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR