28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रसुधाकर द्विवेदीविरोधात वॉरंट जारी

सुधाकर द्विवेदीविरोधात वॉरंट जारी

मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी करणा-या मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने आरोपी क्रमांक १० सुधाकर द्विवेदी उर्फ दयानंद पांडे याच्या विरोधात १० हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. पुढील सुनावणीत हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट जारी होणार असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सुधाकर द्विवेदीविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. कोर्टाने नुकतेच या प्रकरणात आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधातही जामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. सुनावणीच्यावेळी सुधाकर द्विवेदीही न्यायालयात सातत्याने गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे विशेष न्यायाधीश लाहोटी यांनी याबाबत गंभीर दखल घेतली आहे. सुधाकर द्विवेदी विरोधात १० हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. पुढील सुनावणीत हजर न राहिल्यास अजामीनपात्र वॉरंट जारी होणार असल्याचेही कोर्टाने म्हटले आहे.

२० मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश
मालेगाव बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर तसेच इतर आरोपींना मुंबईच्या विशेष न्यायालयाने सोमवारी कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला होता. मात्र प्रज्ञासिंह ठाकूर न्यायालयात हजर राहिल्या नाही. त्याऐवजी ठाकूर यांच्या वकिलाने प्रज्ञासिंह यांची प्रकृती ठीक नसल्याचे सांगत सूट देण्याची मागणी केली होती. विशेष न्यायाधीश ए के लाहोटी यांनी मात्र हा अर्ज फेटाळत प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने एनआयएला २० मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR