24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रनवीन तांदूळ बाजारात

नवीन तांदूळ बाजारात

आवक वाढल्यास दर कमी?

पुणे : प्रतिनिधी
राज्यात काही ठिकाणी डिसेंबर, जानेवारीपासून नवीन तांदूळ बाजारात विक्रीसाठी आला आहे. त्यामुळे तांदळाचे दर पाच ते दहा रुपयांनी उतरले असल्याचे चित्र आहे. ६५ ते ७० रुपयांनी विकला जाणारा कोलम तांदूळ सध्या ५८ ते ६० रुपयांनी विक्री होत आहे.

जानेवारीनंतर आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातील तांदूळ राज्यातील बाजारपेठेत येतो. सध्या जिल्ह्यात नूरजहाँ, चाँदतारा, कोलम, इंद्रायणी, लगान, खुशीयापल, कालीमूंछ, ऐश्वर्या आदी जातीचे तांदूळ विक्री होतात. बाजारात या तांदळाला मागणी आहे. राज्यातील काही जिल्ह्यांतही तांदळाचे उत्पादन झाले असल्याने हा तांदूळही बाजारात आल्याने सध्या तांदळाचे दर काहीसे कमी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. ६५ ते ७० रुपयांनी विकला जाणारा कोलम तांदूळ आता ५८ ते ६० रुपये प्रमाणे विक्री होत आहे. नवीन तांदूळ बाजारात दाखल होत आहे.

नवा तांदूळ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रासह देशातील विविध बाजारात दाखल होतो. तांदूळ निर्यात केल्यास भावात तेजी येऊ शकते. सध्या निर्यात कमी असल्याने भाव स्थिर आहेत. अशीच स्थिती राहिल्यास भाव कमी होऊ शकतात.

राज्यातील गडचिरोली, वर्धा, नाशिक, चंद्रपूर, पुणे, तळेगाव आदी परिसरात तांदूळ उत्पादित केला जातो. तसेच देशात विविध प्रकारचे तांदूळ उत्पादित होतात; मात्र महाराष्ट्रातील तांदूळ सुगंधित व चवदार असल्याने देशभर विक्री होतो. सध्या भाव कमी झालेले असले तरी नवीन तांदूळ बाजारात येत असल्याने पुढील महिन्यात दरात किमान ५ रुपयांपर्यंत घट होऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR