नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना सुप्रीम कोर्टाने झटका दिला असून त्यांची अटकपूर्व जामिनाची याचिका तसेच इतर सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्याचबरोबर तातडीने आत्मसमर्पण करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे सत्येंद्र जैन यांचा तुरुंगवास आता निश्चित मानला जात आहे.
आर्थिक घोटाळाप्रकरणी आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांनी नियमित जामिनासाठी केलेला अर्ज सुप्रीम कोर्टाने सोमवारी फेटाळला. तसेच त्यांच्या इतर याचिका देखील कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना तातडीने आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता त्यांना तात्काळ पोलिसांसमोर हजर व्हावे लागणार आहे.