27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयराजकीय पक्षांना कोट्यवधी देणा-यांमध्ये ३ कंपन्या बीफ एक्सपोर्टर

राजकीय पक्षांना कोट्यवधी देणा-यांमध्ये ३ कंपन्या बीफ एक्सपोर्टर

नवी दिल्ली : देशात सध्या इलेक्टोरल बाँडचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. राजकीय पक्षांना कोट्यवधी रुपयांची देणगी देणा-या कंपन्यांविषयी धक्कादायक माहिती समोर येत आहे. या कंपन्यांनी इलेक्टोरल बाँडच्या माध्यामातून भरभरून देणग्या दिल्या आहेत.

समोर आलेल्या डेटानुसार राजकीय पक्षांना देणगी देणा-या कंपन्यांपैकी तीन कंपन्या या बीफ उद्योगातील आहेत. तसेच यामध्ये सर्वांधिक देणगी फ्यूचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दिली आहे. ही कंपनी लॉटरी व्यवसायाशी संबंधीत असून याचे मालक सेंटियागो मार्टिन आहेत. सध्या मार्टिन कोट्यधीश आहेत पण एकाकाळी ते म्यानमारमध्ये मजूर म्हणून काम करत होते. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने इलेक्टोरल बाँडसंबंधीचा डेटा निवडणूक आयोगाला सोपवला आहे. त्यानंतर हा डेटा निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाइटवर जाहीर केला आहे. या डेटामधून आता वेगवेगळे खुलासे होते आहेत. त्यानुसार अनेक कंपन्या अशा आहेत ज्यांच्यावर ईडी, सीबीआय आणि आयटी डिपार्टमेंटच्या धाडी पडल्यानंतर त्यांनी कोट्यावधी रुपयांचे इलेक्ट्रोल बाँड खरेदी केली. बीफ एक्सपोर्ट करणारी अल्लान सन्स प्रायव्हेट लिमिटेड, फ्रीगोरीफिको अलाना प्रायव्हेट लिमिटेड आणि फ्यूचर गेमिंग देखील या यादीत आहेत. या कंपन्यांच्या विरोधात छापेमारीची कारवाई झाली

त्यानंतरच या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात इलेक्टोरल बाँड खरेदी करून राजकीय पक्षांना देणग्या दिल्या.
९ जुले २०१९ रोजी अल्लाना सन्सने इलेक्टोरल बाँडच्या स्वरुपात दोन कोटी रुपये दान केले होते. यानंतर ९ ऑक्टोबर रोजी एक कोटी आणखी देणगी देण्यात आले. फ्रीगोरीफिको अल्लाना कंपनीने देखील २०१९ मध्ये ९ जुलै रोजी दोन कोटी आणि २२ जानेवारी २०२० रोजी दोन कोटींचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले. अल्लानाा ग्रुपशी संबधीत अल्लाना कोल्ड स्टोरेजने ९ जुलै २०१९ मध्ये एक कोटींचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले. या तिन्ही कंपन्या अल्लाना ग्रुपशी सलग्न आहेत मात्र यांचे डायरेक्टर हेड वेगवेगळे आहेत. अल्लाना कंपनी १८६५ साली स्थापन झाली आणि ही प्रोसेस्ड फूड एक्सपोर्ट करते.

२ हजार कोटींचा कर बुडविला
अल्लाना ग्रुपच्या चीन कंपन्यांनी एकूण सात कोटी देणगी दिली आहे. एप्रिल २०१९ मध्ये कंपनीवर इन्कम टॅक्स विभागाची धाड पडली होती. यानंतर ९ महिन्यात अल्लाना ग्रुपने सात कोटींचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले. इन्कम टॅक्स अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार अल्लाना कंपनी बीफ एक्सपोर्ट करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी मानली जाते. अल्लान ग्रुपवर दोन हजार कोटींचा टॅक्स बुडवल्याचा आरोप आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR