27.7 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeनांदेडमुखेड : वाडी-तांड्यांवर पाणीटंचाईचे सावट

मुखेड : वाडी-तांड्यांवर पाणीटंचाईचे सावट

मुखेड : महेताब शेख
मुखेड तालुक्यातील १२९ ग्रामपंचायतीपैकी २१ गावातील ग्रामपंचायतींकडून बोअर, विहीर अधिग्रहणासाठी तर ८ ग्रामपंचायतींकडून वाडी- तांड्यासाठी टँकरचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर करण्यात आला आहे. यापैकी ९ ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

मुखेड तालुक्यात फेब्रुवारी, मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता अधिक वाढली असून उष्णतेमुळे उन्हाचे चटके जाणवायला लागले आहेत.उन्ह,गमीर्मुळे अंगाची लाही लाही होत आहे यावर्षी पाऊस ब-यापैकी झाला असला तरी सिंचन साठवणांची साधने पुरेसे नसल्याने वाडी तांड्यावर पाणटंचाईचे सावट म्हणजेच चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. पाणीटंचाई निर्मूलनार्थं उपाययोजनांची अंमलबजावणी त्वरित करावी अशी मागणी जनतेतून वाढली आहे.तालुक्यातील येवती व फुटकळवाडी येथे पाण्याची गंभीर परिस्थिती आहे.पाणीपुरवठासाठी मागणी असलेल्या गावांना तसेच वाडी-तांड्याना तहसीलदार राजेश जाधव व गटविकास अधिकारी चंद्रशेखर रामोड यांनी अधिग्रहण व टँकर पुरवठासाठी भेटी देत आहेत.डिसेंबर महिन्यात पंचायत समिती कार्यालयात बोअर/विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव आले आहेत.त्यापैकी ९ गावांचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत यामध्ये तारदडवाडी, येवती,पळसवाडी, लोभा तांडा, अर्जुन तांडा,लखू तांडा, सोसायटी तांडा,रत्नाकर, लोका तांडा, शिवाजी नगर तांडा,

यशवंत नगर तांडासाठी आठ ग्रामपंचायतीने टँकरसाठी प्रस्ताव सादर केले आहे. तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा बैठक संपन्न झाली होती. पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडे हरिश्चंद्र तांडा, फकिरा तांडा,भोजू तांडा,ताईबाई तांडा,भवानी तांडा, बामणी तांडा, भिमवाडी, रामवाडी, कलबंर तांडा, रत्नातांडा, पळसवाडी, रत्नातांडा, वसंतनगर, प्रभुनगर/देवीनगर तांडा,मानसिंग तांडा, लखू गंगाराम तांडा,काळू तांडा, सेवादास नगर, सकनूर, मुक्रमाबाद,कोटग्याळ,खैरका या गावातील व अंतर्गत वाडी तांड्याचे प्रस्ताव विहीर, बोअर अधिग्रहन व टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी दाखल करण्यात आले आहेत.सदर गावात स्थळ पाहणी वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांनी करत आहेत.२१ ग्रामपंचायत अंतर्गत येणारी गावातुन विहीर-बोअर अधिग्रहणासाठी व वाडी- तांड्यातुन ८ टँकरने पाणीपुरवठा करण्याचे मागणीचे प्रस्ताव पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मनोज राठोड यांनी दिली आहे.

मुखेड तालुक्यात सध्या पाणीटंचाईचे सावट गोंगावत असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे. उन्हाची तीव्रता जोमाने वाढत असल्यामुळे नदी,नाले,विहीरीचे पाणी आटत असल्याचे बोलल्या जात आहे तसेच उष्णतेमुळे बोअरची पाणीपातळी कमी होवून पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाल्याची परिस्थिती पहावयास मिळत आहे.ज्या गावातून टँकरणे पाणीपुरवठा करण्याची व विहीर,बोअर अधिग्रहनाची मागणी आहे त्याठिकाणची तातडीने समस्या सोडवून पाणीपुरवठा करावे अशी मागणी नागरिकांतुन करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR