कोल्हापूर : प्रतिनिधी
सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यातच महाविकासआघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची भेट घेतली.
या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अधिकृतपणे श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या नावाची घोषणा केली.
आज कोल्हापुरात शाहू महाराजांची भेट घेतली आहे. तुम्हाला आणखी काही सांगण्याची आवश्यकता नाही. ठाकरे कुटुंब आणि छत्रपती शाहू महाराजांचे ऋणानुबंध हे माझ्या आजोबांपासून आहेत.
मला आनंद आहे की या पिढीत आणि पुढच्या पिढीतही ते घनिष्ठ राहतील. आज महाविकासआघाडीतर्फे शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराजांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही. कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. मराठी अस्मितेचा प्रश्न आहे. मी महाराजांना वचन दिले आहे की मी प्रचाराला येणार आणि विजयाच्या सभेलाही नक्की येणार, असे उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटले.