उदगीर : प्रतिनिधी
शहरातील सर्वच मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे , बेशीस्तरिक्षा ठेले, हातगाडे, यांच्यामुळे रहदारीचा प्रश्न पोलीस प्रशासन व नगरपरिषद प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे गंभीर होत असून नागरीकांना याचा त्रास सन करावा लागत आहे. नगर परिषदेच्यावतीने ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन करुन जाहिरात केली परंतु अतिक्रमण हटाव मोहीम विभागाकडून कुठलीच कारवाई केली गेली जात नसल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढल्याने सामान्य नागरिकांना व वाहन चालकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे
शहरातील मुख्य रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वसंतराव नाईक चौक, तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अग्निशामक दलाच्या कार्यालयापर्यंत , छञपती शिवाजी महाराघ चौक ते उमा चौक (जाकेर हुसेन चौक ) पर्यंतच्या सर्विस रोडवर दुकांनदारांनी दुकानातील साहित्य रस्त्यावर ठेवत असल्याने तसेच हातगाडी ठेलेवाल्यांनी रस्त्यावर दुकाने थाटल्याने रहदारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. याकडे प्रशासन डोळेझाक करीत असल्याचे दिसत आहे.