नांदेड : विशेष प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष आपले स्टार प्रचारक जाहीर करीत असतो. त्या स्टार प्रचारकांचा खर्च आचारसंहितेत ग्रा धरला जात नाही. प्रत्येक राष्ट्रीयकृत पक्षाला स्टार प्रचारक जाहीर करावे लागतात. त्यामध्ये महायुतीने प्रथम बाजी मारली असून नरेंद्र मोदीपासून ते अशोक चव्हाणांपर्यंत जवळपास ४० जणांची यादी जाहीर केली आहे. नव्यानेच पक्षात दाखल झाल्यानंतर अशोक चव्हाणांचे नाव स्टार प्रचारकांमध्ये आल्याने नांदेडकरांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
महायुतीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारक जाहीर केले असून महायुतीच्या प्रचार आणि प्रसारासाठी हे स्टार प्रचारक संपूर्ण देशात दौरे करणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नरेंद्र मोदी, अमित शहा, जे.पी. नड्डा, राजनाथसिंह, एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, नारायण राणे, अनुराग ठाकूर, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, प्रमोद सावंत, भूपेंद्र पटेल, विष्णूदेव साई, डॉ.मोहन यादव, भजनलाल शर्मा, ज्योतिरादित्य सिंधिया, स्मृती इराणी, रावसाहेब दानवे, शिवराजसिंह चौहान, सम्राट चौधरी, अशोक चव्हाण, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे, पियूष गोयल, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, के.अन्नामलाई, मनोज तिवारी, रवीकिसन, अमर साबळे, विजयकुमार गावित, अतुल सावे, धनंजय महाडिक यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीने एकूण ४० स्टार प्रचारक जाहीर केले आहेत. यात महाराष्ट्राच्या नेत्यांची मोठ्या प्रमाणात वर्णी असल्याचे दिसून येते. भाजपचे नॅशनल जनरल सेक्रेटरी अरुण सिंग यांनी ही यादी जाहीर केली आहे.