24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयइंडिया आघाडीच्या महारॅलीला सुरुवात

इंडिया आघाडीच्या महारॅलीला सुरुवात

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘आप’चे सर्वेसर्वा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याविरोधात आज दिल्लीच्या रामलीला मैदानावर ‘इंडिया आघाडी’ची महारॅली होणार आहे.

या महारॅलीत ‘हुकूमशाही हटवा, लोकशाही वाचवा’ हा मुख्य नारा इंडिया आघाडीचा असणार आहे. या रॅलीसाठी रामलीला मैदानात लोकांनी तुफान गर्दी केली असून महाराष्ट्रासह देशभरातील विरोधी पक्षाचे नेते या रॅलीला हजर झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष खरगे, प्रियंका गांधी, अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, उध्दव बाळासाहेब ठाकरे, खासदार संजय राऊत, सीपीआयचे नेते डी . राजा यांच्यासह ‘आप’चे मंत्री आतिशी भारव्दाज यांच्यासह तृणमूल काँग्रेस, सपा आणि आरजेडी आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे नेतेही या महारॅलीला हजर झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR