28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीय१९ एप्रिल ते १ जून दरम्यान एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत : निवडणूक आयोग

१९ एप्रिल ते १ जून दरम्यान एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत : निवडणूक आयोग

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने १९ एप्रिलला सकाळी ७ पासून ते १ जूनला संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत एक्झिट पोलवर निवडणूक आयोगाने प्रतिबंध लावल्याची घोषणा केली आहे.

निवडणुकीच्या पूर्वी अनेक वृत्तसंस्था, वृत्तवाहिन्या एक्झिट पोल दाखवतात. त्याचा प्रभाव पुढच्या टप्प्यातील मतदानावर पडू शकतो, त्याव्यतिरिक्त पुढील मतदानावर प्रभाव टाकू शकतील, अशा गोष्टी होण्याची शक्यता असते.

त्यासाठी निवडणूक आयोगाने एक अधिसूचना जारी केली असून त्यामध्ये आगामी लोकसभा आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होईल तेव्हा १९ एप्रिल रोजी सकाळी ७ वा. पासून ते १ जूनला संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत एक्झिट पोलचे आयोजन, प्रकाशन किंवा प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीबरोबरच आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीमच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. या कालावधीत १२ राज्यांतील २५ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकाही होत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR