28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रअकोल्यात होणार तिरंगी लढत

अकोल्यात होणार तिरंगी लढत

अकोला : सोमवारी रात्री काँग्रेसतर्फे डॉ. अभय काशिनाथ पाटील यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. त्यामुळे आता अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील व वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात थेट तिरंगी लढत होणार आहे.

भाजपाने पहिल्या टपप्प्यातील लोकसभा निवडणूकासाठी अकोला लोकसभा मतदारसंघातून खासदारपुत्र अनुप धोत्रे यांची उमेदवारी जाहिर केली. दरम्यान महाविकास आघाडी सोबत आघाडी होण्याची शक्यता धुसर झाल्यानंतर वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदार संघातून नामांकन सादर केले. तर काँग्रेसतर्फे आता कोण असा प्रश्न उपस्थित झाला असतानाच सोमवारी रात्री काँग्रेसतर्फे डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी जाहिर झाली. त्यामुळे महाविकास विकास आघाडीचा तिढा अखेर सुटला. भाजपाचे अनुप धोत्रे हे ३ एप्रिल तर काँग्रेसचे डॉ. अभय पाटील हे ४ एप्रिल रोजी नामांकन सादर करणार आहेत. अनुप धोत्रे व डॉ. अभय पाटील हे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. तर गेल्या लोकसभा निवडणुकीत आंबेडकर यांनी सोलापूर मतदार संघातुन उमेदवारी दाखल केली होती.

अकोला प्रकाश आंबेडकर यांचा परंपरागत लोकसभा मतदार संघ असुन या मतदार संघातून त्यांनी दोनदा (१९९८ आणि १९९९) लोकसभेत प्रतिनिधीत्व केले आहे. पण, इतर सर्व निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाला होता हे विशेष. यंदा संपुर्ण राज्याचे लक्ष अकोला लोकसभा मतदार संघाकडे लागले आहे. ही निवडणूक तिन्ही उमेदवारांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची असल्याने उमेदवारांना चांगलाच कस या निवडणूकीत लावावा लागणार आहे.

असा आहे निवडणुक कार्यक्रम
अकोला लोकसभा मतदार संघात नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम दिनांक ही ४ एप्रिल आहे. उमेदवारी अर्ज छाननी ५ एप्रिल रोजी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ एप्रिल रोजीची आहे. तर मतदान २६ एप्रिल रोजी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR