25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूरविधी संघर्षग्रस्त बालकाकडून चोरीच्या ७ दुचाकी जप्त

विधी संघर्षग्रस्त बालकाकडून चोरीच्या ७ दुचाकी जप्त

सोलापूर – सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयातील जोडभावी पेठ पोलिस ठाण्याच्या पथकाने विधी संघर्ष बालकास ताब्यात घेऊन त्याच्याकडून १ लाख ९५ हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या ७ दुचाकी जप्त केल्या आहेत. या बालकाकडून जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात दाखल असलेले ६ गुन्हे उघडकीस आले आहेत.

रुपाभावानी मंदीराच्या पाठीमागील पुणे महामार्गावर दुचाकी विक्रिसाठी एक जण एका पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवर येणार असल्याची माहिती जोडभावी पेठ पोलिसांना मिळालेली होती. त्यावेळी पोलिसांनी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन त्याच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केली. त्यावेळी त्याने ती दुचाकी चोरीची असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलास विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने अनेक दुचाकी चोरल्याचे कबुल केले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या ७ दुबाकी जप्त केल्या. या विधी संघर्ष बालकाकडून जोडभावी पेठ पोलिस ठाण्यातील ६ आणि कर्नाटकातील अफजलपूर पोलिस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आला आहे.

ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त विजय कबाडे, सहायक आयुक्त अशोक तोरडमल, पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पडसळकर, विजय जाधव, हवालदार खाजप्पा आरेनवरू, श्रीकांत पवार, शितल शिवशरण, स्वप्नील कसगावडे, दादासाहेब सरदवे, दत्ता काटे, अभिजित पवार, निलेश घोगरे, मलिनाथ स्वामी, सतीश माने, सोमनाथ थिटे, गणेश क्षिरसागर यांनी केली. जोडभावी पेठ पोलिसांनी ताब्यात घेतलेला विधीसंघर्ष बालक हा मौजमजा करण्यासाठी तसेच नशा करण्यासाठी वाहन चोरीसारखे गुन्हे करीत असल्याचे पोलिस तपासात निष्पन झाले आहे. या विधीसंघर्ष बालकाची आई ही मोलमजुरी करते तर वडीलांचे निधन झालेले आहे. त्याचे शिक्षण देखील ८ वी पर्यंत झालेले असून त्याच्याकडे कुणी लक्ष देणारे नसल्यामुळे तो गुन्हेगारी कृत्यांकडे वळला गेला असावा असा पोलिसांचा संशय आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR