लातूर प्रतिनिधी :
काँग्रेसचा पक्षाचा विचार नेहमीच तेवत ठेवण्याचे काम चाकुरने केले आहे.
यामुळे चाकूर हे काँग्रेसचे मूळ आहे, चाकूरणे काँग्रेस पक्षाचे काम
करण्यासाठी आम्हाला नेहमीच प्रेरणा दिली आहे. देशात लोकसभेची निवडणूक ही
एनडीए विरुद्ध इंडिया होत आहे. तर राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध
महायुती अशी होत आहे, हा वैचारिक लढा आपण देश, राज्य जिल्हा वाचवण्यासाठी लढत आहोत असे लातूरच्या राजकारणाची उज्वल परंपरा आहे, त्यामुळे लातूरलोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगेयांच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन राज्याचेमाजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजीपालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
बुधवार दि. ३ एप्रिल रोजी सायंकाळी लातूर-नांदेड रोडवरील जुना बस स्टॅन्ड
चाकूर येथे महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून महाविकास
आघाडीचे लातूर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनाविजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी काँग्रेसचे अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक माजी महापौर
विक्रांत गोजमगुंडे, अहमदपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.गणेश कदम,
चाकूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विलास पाटील चाकूरकर, एन.आर.पाटील,
चंद्रकांत मद्दे, निलेश देशमुख, नीलकंठ मिरकले, अनिल चव्हाण, पप्पू भाई
शेख आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, चाकूर हे काँग्रेसचे
मूळ आहे चाकूरणे आम्हाला नेहमीच प्रेरणा दिली आहे. काँग्रेसचा विचार
नेहमीच तेवत ठेवण्याचे काम चाकुरने केले आहे. देशात लोकसभेची निवडणूक ही
एनडीए विरुद्ध इंडिया होत आहे. तर राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध
महायुती अशी होत आहे, हा वैचारिक लढा आपण देश, राज्य जिल्हा वाचवण्यासाठीलढत आहोत असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, या विद्यमान सत्तेला आपल्याला पराभूत करायचे आहे, सध्याचे भाजप खासदार हे चाकूर तालुक्याचे आहेत पण ते लातूर लोकसभा मतदारसंघातील देवणी, लोहा, कंधार तालुक्यात आतापर्यंत फिरकलेच नाहीत. कंत्राटदार उमेदवारा विरुद्ध डॉक्टर उमेदवार अशी लातूर लोकसभेची लढत होत आहे. लातूरच्या राजकारणाची उज्वल परंपरा आहे, त्यामुळे लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.शिवाजी काळगे यांच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.