सोलापूर : भावसार जेष्ठ नागरीक संघटनेतर्फे जागतिक हिला दिनानिमित्त भावसार समाजातील २५ महिला डॉक्टर, १० एम.आर., १० परिचारिका यांचा गौरव करण्यात आला. श्री हिंगुलांबिका सांस्कृतिक भवन येथे समाज अध्यक्ष राजकुमार हंचाटे, भावसार नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन किरण क्षीरसागर, महिला मंडळाच्या अध्यक्षा सरीता जवळकर डॉ. कीर्ती कटारे, भावसार जेष्ठ नागरीक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जवळकर, सचिव अरुण आकुडे यांच्या हस्ते श्री हिंगलाज मातेचे पूजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते डॉ. कीर्ती कटारे यांचा परिचय प्रसिद्धी प्रमुख व्यंकटेश वैकुंठे यांनी करून दिला.
सम माजातील महिला डॉक्टर, एम. आर., परिचारिका यांना कै. श्रीकृष्ण रंगदळ यांच्या स्मरणार्थ स्मृर्ती चिन्ह, पुष्पगुच्छ व भेट वस्तू त्यांच्या पत्नी शांताबाई रंगदळ यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. तसेच राजकुमार हंचाटे, किरण क्षीरसागर, सरीता जवळकर, व्याख्याते डॉ. किर्ती कटारे, बाबुराव हंचाटे, प्रकाश जवळकर, अरूण आकुडे, रवींद्र आकुडे, रविंद्र खमितकर यांच्या हस्ते स्मृती चिन्ह ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे कार्याध्यक्ष शशिकांत रंगदळ यांनी उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. कार्यक्रमची प्रस्तावना खजिनदार रविंद्र खमितकर यांनी केले. सचिव अरुण आकुडे यांनी आभार प्रदर्शन केले.