सोलापूर – सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात २०२.९५ कोटी रुपयांचा महसुल मिळाला आहे. आर्थिक वर्षात दिलेल्या उद्दीष्ठापैकी ८७.९३ टक्के इतक्या महसूलाची वसूली करण्यात आलेली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली.
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायुवेग पथकाने ७०६.१६ लक्ष इतके तडजोड शुल्क वसूल केले असून एकूण उदिष्टांच्या १००.८८ टक्के इतके तडजोड शुल्काची वसुली करण्यात आलेली आहे. कर वसूली (चालू कर व थकित कर) ३२९.१९ इतकी केलेली आहे. वायुवेग पथकामार्फत हेल्मेट न वापरणाऱ्या ६,८९४ दोषी व्यक्तींवर, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणारे ४७० जणांवर, सीटबेल्ट प्रकरणी १,२७९ जणांवर कारवाई करण्यात आलेली असून विमा नसलेली ६,८२६ वाहने, पीयूसी नसलेली ३,९२६ वाहने, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण नसलेली ६,०९१, रिफलेक्टर/टेल लॅप नसलेली ३,०२७ व क्षमतेपेक्षा जास्त ९३४ माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक स्वरुपाची कारवाई सन वर्षामध्ये वाहनांची करण्यात आलेली आहे.
२०२३-२४ या आर्थिक ६२,७६३ इतक्या नवीन नोंद सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे झालेली असून त्याामध्ये मोटार सायकल वाहन संख्या ४८,१३५, मोटार कार संख्या ५,९३४, मोटार कँब संवर्ग वाहन संख्या २०९, ऑटोरीक्षावाहन संख्या १,१२८, सर्व प्रवासी वाहन संख्या १४१, सर्व मालवाहू संवर्गातील वाहन संख्या २,८७६ व इतर संवर्गातील वाहन संख्या ४,३४० अशी आहे. तसेच सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाम ध्ये एकूण २८,९३६ अर्जदारांना लायसन्स (अनुज्ञप्ती) देण्यात आलेली आहे.
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये नांदणी येथील सीमा तपासणी नाका येथे ११ कोटी १५ लाख ७८ हजार ३२० रुपये इतके तडजोड शुल्क़ व ५ कोटी ४२ लाख ९ हजार ७१५ रुपये इतकी कर स्वरूपातील महसूलाची प्रत्याक्ष वसुली केलेली असून एकूण उदिष्टांच्या ९७.५० टक्के इतक्या म हसूलाची वसूली करण्यात आलेली आहे. कात्राळ सीमा तपासणी नाका येथे २९ लाख ५९ हजार ि रुपये इतके तडजोड शुल्क व ५१ लाख ७९ हजार ४१५ रुपये इतके कर महसूलाची प्रत्याक्षात वसुली केलेली असून एकूण उदिष्टांच्या १६२.७६ टक्के इतक्या महसूलाची वसूली करण्यात आलेली आहे.
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये अटकावून ठेवलेल्या वाहनांचा ई-लिलाव करण्यात आला असून या ई-लिलावामधून १६ लाख ८० हजार ४०० रुपये इतका महसूल मिळालेला आहे. कालबाहय झालेल्या अभिलेखाचे निर्लेखन करण्यात आले असून त्याामधून ३ लाख ६ हजार १६ रुपये इतका महसूल प्राप्त झालेला असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. सोलापूर कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून शासनाने दिलेल्या उद्दिष्ठांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.