27.1 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeलातूररायवाडीतील नारी शक्तीचा १०० टक्के मतदानाचा संकल्प

रायवाडीतील नारी शक्तीचा १०० टक्के मतदानाचा संकल्प

चाकूर : प्रतिनिधी
लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ साठी चाकूर तालुक्यातील रायवाडी गावातून ७ मे रोजी १०० टक्के मतदान कण्यासाठी दि.१ एप्रिल रोजी सायंकाळी सप्ताह कार्यक्रमात नारी शक्तीने मतदान करण्याचे वचन घेतले. उपस्थितीत मतदार बंधूना मतदार करण्यासाठी स्वीप पथकाने जनजागृती कारण्यात आले.
या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे, अहमदपूरचे तहसीलदार शिवाजी पालेपाड व तहसीलदार नरंिसग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे,जयंिसंह जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात जनजागृती कार्यक्रम करण्यात येत स्वीपचे सदस्य महादेव खळुरे, शिवकुमार गुळवे, मोहन तेलंगे, नागनाथ स्वामी,बस्वेश्वर थोटे, पुरुषोत्तम काळे,श्रीमती अर्चना माने,प्रमोद हुडगे,ध्ह्यानंजय नाकडे, ग्रामसेवक सुनील कटके गावातील प्रतिष्ठित नागरिक हरीषचंद्र मुरकुटे, परमेश्वर केदार, वैजनाथ कराड यांच्या सह गावातील मतदार बंधू भगिणिनी उपस्थितीत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR