26.6 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर काशीत बोगद्यात भूस्खलन

उत्तर काशीत बोगद्यात भूस्खलन

४० हून अधिक कामगार अडकल्याची भीती

उत्तराखंड : उत्तराखंडमधील उत्तर काशी येथे आज (दि. १२) पहाटे पाचच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. उत्तर काशी येथील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यरा ते दंडलगाव या बोगद्यात काम सुरू असताना त्याचा काही भाग कोसळून ही दुर्घटना घडली. दरम्यान, या घटनेत ४० हून अधिक कामगार ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. उत्तर काशी येथील जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने या घटनेला दुजोरा दिला आहे. बचावकार्य वेगाने सुरू आहे. रविवारी पहाटे ५ वाजता ही भूस्खलनाची दुर्घटना घडली.

भूस्खलन बोगद्याच्या प्रवेशद्वारापासून २०० मीटर आत अंतरावर झाले आहे. तर काम करणारे कामगार वाहनाच्या प्रवेशद्वारापासून २८०० मीटर आत होते. या बोगद्याची लांबी ४.५ कि.मी. आहे. त्यापैकी बोगद्याचे ४ कि.मी.चे बांधकाम पूर्ण झाले आहे. यापूर्वी हा बोगदा बांधण्याचे उद्दिष्ट सप्टेंबर २०२३ होते, मात्र आता ते मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बोगद्याचे बांधकाम सुरू असतानाच बोगद्याचा काही भाग कोसळला. यामध्ये भूस्खलन होऊन ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान यामध्ये ४० हून अधिक कामगार अडकल्याची भीती आहे.

नवयुग कंपनीमार्फत हा बोगदा बांधण्यात येत आहे. दरम्यान दरड कोसळण्याची दुर्घटना आज (दि. १२) पहाटे घडली. ४० हून अधिक कामगार ढिगा-याखाली अडकले आहेत. मात्र, बोगद्यात किती कामगार अडकले आहेत, याचा अचूक अंदाज अद्याप आलेला नाही. कंपनीकडून डेब्रिज हटवण्याचे काम सुरू आहे. कामगारांच्या सुटकेसाठी पाच रुग्णवाहिकाही घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत.

कामगार २८०० मीटर आत अडकले
या दुर्घटनेची माहिती मिळताच, पोलिस दलासह एसडीआरएफ आणि इतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. बोगद्याच्या प्रवेशद्वारापासून सिलक्याराकडे जाणा-या २०० मीटर अंतरावर हे भूस्खलन झाले आहे. बोगद्यात काम करणारे कामगार प्रवेशद्वाराच्या २८०० मीटर आत आहेत, असेही बाचव यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR