27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeछत्रपती संभाजीनगर‘भुमरे भाजप के साथ घुमरे’

‘भुमरे भाजप के साथ घुमरे’

छत्रपती संभाजीनगर : पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी शुक्रवारी पहिल्यांदाच भाजपच्या मंत्र्यांना आणि संघटनेच्या पदाधिका-यांना चहासाठी कार्यालयात बोलविले होते. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. शिंदेसेना आणि भाजपमध्ये जागेसाठी रोज बैठकांचे सत्र सुरू असताना, पालकमंत्र्यांच्या निमंत्रणावर भाजपने त्यांच्या कार्यालयात जाऊन ‘चाय पे चर्चा’ केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

चर्चेमध्ये भुमरे यांंनी जागा कुणालाही सुटो महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन केले. तसेच, प्रचार कार्यालयासाठी मोंढा नाका येथील जागा देखील शोधली असल्याचे भाजप नेत्यांना सांगितले. चर्चेअंती ही सगळी तयारी पाहता भाजप नेत्यांचे अवसान गळाले. नेमके काय चालले आहे, जागा शिंदेसेनेला गेल्याप्रमाणेच चर्चेचा सगळा नूर पाहता भाजप नेत्यांनी उपमुख्यमंत्र्यांना एसएमएस पाठविले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR