33.1 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रयशवंत सेनेची पहिली यादी; भाजपची चिंता वाढली

यशवंत सेनेची पहिली यादी; भाजपची चिंता वाढली

मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी नेहमी आक्रमक भूमिका घेत आंदोलन करणा-या यशवंत सेना देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.

दरम्यान यशवंत सेनेच्या उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे माधव पॅटर्न अर्थात माळी-धनगर-वंजारी या समाजाच्या नेत्यांना उमेदवारी देऊन महायुतीकडून आखण्यात आलेल्या प्लॅनला यशवंत सेनेच्या निर्णयाने मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अनेकवेळा आंदोलन, मोर्चे काढून देखील धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्याने, यशवंत सेनेने लोकसभेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडकले यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभेचेच्या सहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण सहा उमेदवार जाहीर झाले असून, यामध्ये सोलापूर लोकसभा, माढा लोकसभा, रावेर लोकसभा, अहमदनगर लोकसभा, धुळे लोकसभा आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तर, या लोकसभेच्या निवडणुकीत एकूण १५ उमेदवार यशवंत सेनेच्या वतीने निवडणुकीच्या ंिरगणात उतरवण्यात येणार आहेत.

सरकार धनगर विरोधी सरकार : दोडतले
मागील अनेक वर्षांपासून धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राज्यातील धनगर बांधव आंदोलन, मोर्चे काढून आपली मागणी शसन दरबारी पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक निवडणुकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा चर्चेत येत असतो. तर, राजकीय पक्षांकडून याबाबत आश्वासन देखील देण्यात येतात. पण प्रत्यक्षात यावर तोडगा निघत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान यावरच बोलताना यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सध्याचे सरकार हे धनगर विरोधी सरकार असल्याची टिका बाळासाहेब दोडतले यांनी केली असून, निवडणुकीच्या रिंगणात उतरूनच सरकारला उत्तर देण्याचा निर्णय यशवंत सेनेने घेतला असल्याचे ते म्हणाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR