मुंबई : आम्ही शांत नाही. लोकसभा निवडणुकीबाबत राज ठाकरे हे पाडव्याच्या सभेत निर्णय जाहीर करतील. पक्षाने निर्देश दिले आहेत की याबाबत फक्त राज ठाकरे निर्देश देतील. आम्ही सगळीकडे फिरतो, ही निवडणूक मोठी किचकट आणि गुंतागुंतीची आहे. राज ठाकरे याबाबत चिंतन करत असतील. राज ठाकरे जेव्हा शांत असतात तेव्हा जास्त चिंतन करत असतात असे मनसे नेते प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे.
मीडियाशी बोलताना प्रकाश महाजन यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेची तयारी आणि एकंदरीत घडामोडींबाबत भाष्य केले. तसेच काँग्रेसवरही निशाणा साधला. काँग्रेस हे मोडकळीस आलेले घर आहे. काँग्रेसमधून बाहेर पडण्यासाठी गर्दी होत आहे. काँग्रेसचे दार चिंचोळे आहे त्यामुळे तिकडे बाहेर पडताना चेंगराचेंगरी सुरू आहे. दारुण पराभव होऊ नये यासाठी उभे राहायला कुणी तयार नाही, असा टोला प्रकाश महाजन यांनी लगावला.