25.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रभुजबळ मैदानात उतरल्यास योग्य भूमिका ठरविणार

भुजबळ मैदानात उतरल्यास योग्य भूमिका ठरविणार

पुणे : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. आज पुण्यातील देहूत संत तुकाराम महाराजांच्या चरणी मनोज जरांगे पाटील लीन झाले. पत्रकरांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना खुले आव्हान दिले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळांनी फक्त उभे राहावे, मग आमची भूमिका सांगतो, असा इशारा जरांगेनी भुजबळांना दिला. भुजबळांबद्दल जास्तीचे काही विचारू नका. त्यांनी लोकसभा लढायचे अंतिम केल्यावर सांगतो, असे ते म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी लढा सुरू असताना ओबीसी नेते छगन भुजबळ आणि जरांगेंमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली होती. अशातच भुजबळ नाशिक लोकसभेतून नशीब अजमावणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर ते म्हणाले की, मराठा समाजाने राज्यभर कोण-कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचे हे ठरवावे. पण नाशिक लोकसभेत जर भुजबळ उभे राहिले, तर मग तिथे काय भूमिका घ्यायची हे मी त्यावेळी सांगतो, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा असतानाच मनोज जरांगे पाटील उद्या नाशिक दौ-यावर येणार आहेत. त्यामुळे नाशिकमधील राजकीय वातावरण तापणार असून मनोज जरांगे पाटील नाशिकमध्ये काय बोलणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या अगोदर शनिवारी नाशिकमध्ये सकल मराठा समाजाने पत्रकार परिषद घेत छगन भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR