24.6 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeहिंगोलीहिंगोलीत दोन शिवसेनेत लढत

हिंगोलीत दोन शिवसेनेत लढत

हिंगोली/प्रतिनिधी : हिंगोली लोकसभा मतदारसंघात निवडणूक २०२४ ची रणधुमाळी सुरू झाली असून, हा मतदारसंघ १९७७ ला अस्तित्वात आल्यापासून दोन शिवसेनेत लढत होणार असून आत्तापर्यंत एकाच विधानसभेचे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आपले भाग्य आजमावित आहेत.
नागेश पाटील आष्टीकर व बाबुराव कदम कोहळीकर हे दोन्हीही हदगाव विधानसभेचे उमेदवार आहेत.

यापूर्वी १९७७ पासून एका विधानसभेचे आमने-सामने उभे राहणारे हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत. लढत होत असून काँग्रेस व भाजपने या दोन्ही पक्षांनी शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गट व शिंदेंचा शिवसेना गट यात टक्कर लावून दिली असून आघाडीतर्फे नागेश पाटील आष्टीकर व युतीतर्फे बाबुराव कदम हे असून एनडीएने शिंदे शिवसेनेला जागा सोडली व आघाडीने उध्दव शिवसेनेला जागा सोडली. यात शिवसेनेत टक्कर लावून भाजप व काँग्रेस बघ्याची भूमिका घेत आहेत.

 

भाजपकडून बंडखोरी करून वसमतचे शिवाजीराव जाधव यांनी उमेदवारी मागे घेतली नाही व भाजपचे रामदास पाटील सोमठाणकर व श्याम महाराज भारती, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई पाटील, शिवाजीराव माने यांनी उमेदवारी मागे घेतली. परंतु त्यांचा निवडणुकीतला उत्साह मावळला आहे. रामदास पाटील यांनी गिरीश महाजन ग्रामविकास मंत्री, केंद्रीय मंत्री भागवत क-हाड व अनेक भाजप नेत्यांनी रामदास पाटील यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी केली. परंतु रामदास पाटील हे ठाम होते.

शेवटी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोनवरून चर्चा केल्यानंतरच रामदास पाटील यांनी माघार घेतली. हिंगोलीचे भाजपचे आमदार मुटकुळे यांचीही नाराजी दिसून आली. त्यामुळे एनडीएचा उमदेवार कदम यांच्यावर भाजपच्या नाराजीचा परिणाम होतो की, फायदा होतो हे येणा-या काळातच समजेल. आघाडीचे व ठाकरे शिवसेनेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर काँग्रेसला जागा न सुटल्याने कै. खा. राजीव सातव यांच्या पत्नी आ. प्रज्ञाताई सातव, वसमतचे माजी मंत्री शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा, रूपालीताई राजेश पाटील गोरेगावकर यांचाही नाराजीचा सुरू असून हे येणा-या काळातच समजेल.

आघाडी व एनडीए यांच्यात वंचित बहुजन आघाडी व एनडीएचे बंडखोर उमेदवार शिवाजीराव जाधव यांचा शिंदे गटावर की उध्दव गटावर परिणाम होता अशी हिंगोली जिल्ह्यातील मतदार चर्चा करताना दिसत असून दोन्ही उमेदवार जिल्हाबाहेरील असल्याने जिल्ह्यातील मतदारांचा नाराजीचा सूर दिसून येत आहे. नागेश पाटील आष्टीकर यांनी आपला उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शनासह शांततेत भरला. बाबुराव कदम यांनी सुध्दा आपली ताकद दाखवत उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोघांमध्ये लढत होणार असून, दोघे कोणाला वाचविणार व कोणाला मारणार अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये पाहावयास मिळत आहे. हे निकालानंतरच कळेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR