मुंबई : माझी महाराष्ट्रातील जनतेकडून अपेक्षा आहे की, व्याभिचाराला राज मान्यता मिळू नये. तसे झाले तर पुढचे दिवस भीषण आहेत. वाटाघाटी सुरु होत्या तेव्हा मी यांना सांगितले मला विधानपरिषदही नको आणि राज्यसभा नको. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देत आहे असे मी जाहीर करतो असें मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले. शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाडवा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
येणारी निवडणूक या देशाचे भविष्य ठरवणार आहे.राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र कर भरतो. तेवढाच निधी वाट्याला यावा, अशी अपेक्षा आहे. येणारी निवडणूक या देशाचे भविष्य ठरवणार आहे. अनेक निवडणुका येतील. विधानसभा निवडणुका येतील. त्यामध्ये काय होईल? मी इथेच गेल्यावर्षी सभेत महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला आहे. कोणती सोंगटी कुठे पडलीये माहिती नाही. माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी जीन्स घालून ट्रॅक्टरवर बसलेला हवा आहे. सर्वात तरुण देश आज भारत आहे. सर्वाधिक तरुण ना अमेरीका आहे ना जपान आहे. या तरुण तरुणींना चांगल्या शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने काम केले पाहिजे. उद्योगपतींनी देश सोडून जाऊ नये. १० वर्षानंतर देश म्हातारा व्हायला लागेल. तरुणांकडे मोदींनी लक्ष दिले पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, मी जे ऐकत होतो. ते ५ वर्षात दिसत नाहीये. ज्या गोष्टी मला पटलेल्या नाहीत ते पटलेल्या नाहीत. ज्या गोष्टी चांगल्या वाटल्या त्याच कौतुक करणार नाही आवडल्या तर टीका करणार आहेच. माझा राग टोकाचा आहे. महाराष्ट्रातील लोकांवर, मराठी माणसावर, मराठी भाषेवर टोकाचं प्रेम करतो. मात्र, मला तशी गोष्ट दिसली नाही तर स्वत: विरोध करतो. ३७० कलम रद्द झालं तेव्हा अभिनंदन केलं. ज्या गोष्टी चांगल्या घडल्या त्याच अभिनंदन केलं. ज्यावेळी एक माणूस एका प्रांताचा विचार करतोय नाही म्हटले. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत नरेंद्र मोदींवर व्यक्तीगत टीका करतात. मी तशी केली नाही. मुख्यमंत्री पद मिळाले नाही म्हणून मी टीका करत नाही. तुम्हाला सत्तेत हाकलून दिले म्हणून तुम्ही त्यांच्यावर टीका करतात. तुम्हाला काय हवे आहे हे सांगण्यासाठी आणि मांडण्यासाठी मी आलो असल्याचे ते म्हणाले.