33.5 C
Latur
Sunday, June 2, 2024
Homeराष्ट्रीयकेजरीवालांनी ठोठावला सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा

केजरीवालांनी ठोठावला सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिल्ली दारू घोटाळ्या प्रकरणी अटकेला आव्हान देणारी याचिका मंगळवाली दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली होती, आणि केजरीचवाल यांची अटक कायदेशीर असल्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात केजरीवालांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याच्या ईडीच्या युक्तिवादाची दखल घेतली. न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा म्हणाल्या की, आमच्यासमोर ईडीने दाखल केलेला पुराव्यात ईडीने कायद्याचे पालन करून आणि योग्य पुराव्यासह अटक केली आहे. ट्रायल कोटार्चा आदेश हा दोन ओळींचा आदेश नाही. ईडीकडे केजरीवाल यांना अटक करण्यासाठी सबळ पुरावा आहे, असेही न्यायालयालने म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR