मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात प्रत्येक टप्प्यात दोन सभा होणार आहेत. रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे की, केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळावे. ऐन निवडणुकीत भूमिका बदलणे अतिशय अयोग्य आहे. आम्हाला जरी जागा मिळाली नाही तरी आम्ही महायुतीसोबत आहोत. देशात एनडीएसोबत असणार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.
नरेंद्र मोदी हे देशातली लोकशाही बळकट करत आहेत. जनता दलाच्या काळातही पर्याय निर्माण झाला होता. इंडिया आघाडी नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचे काम करत आहे. संविधान बदलणार या अफवा आहेत, असे आठवले म्हणाले.
लोकसभेला जागा दिली नाही; परंतु विधानसभेत ८ ते १० जागा मिळतील याबाबत चर्चा केली जाईल. गेल्या वेळी आमचे सरकार नव्हते. यामुळे रिपाइंला मंत्रिपद नव्हते. काँग्रेसच्या काळात डॉ. बाबासाहेबांच्या इंदू मिलचे काम केले गेले नाही. काँग्रेस पक्ष रसातळाला जात असून त्याला वर यायला खूप वेळ लागेल, असेही आठवले म्हणाले.