31.1 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्र‘कुछ तो गडबड है’

‘कुछ तो गडबड है’

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान चर्चेत आला आहे. चित्रपट आणि अ‍ॅक्शनमुळे प्रेक्षकांची मने जिंकणारा भाईजान सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपा नेते आशिष शेलार सलमान खानच्या भेटीला गेले होते. त्यानंतर आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी सलमानची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात कुछ तो गडबड है च्या चर्चा रंगल्या आहेत.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी सलग भाईजानची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आले आहे. आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वीच सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. भाईजानच्या कुटुंबीयांबरोबरचा फोटो आशिष शेलार यांनी ट्वीट केला होता. त्यानंतर आता शिंदे गटाचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी सलमान खानची भेट घेतली आहे. श्रीकांत शिंदेंनी ईदनिमित्त भाईजानच्या घरी जाऊन त्याला खास शुभेच्छा दिल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR