पुणे : गेल्या १० ते १५ वर्षात राज ठाकरेंचे ३, ४ निर्णय मी बघितले आहेत असा टोलाही पवार यांनी ठाकरेंना लगावत पवार ज्येष्ठ नेते असल्याने ते तोल मोल के बोल असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. राज ठाकरे कधी भाजपाबाबत एकदम तिखट प्रतिक्रिया दिली आणि बाजूला झाले. कधी पाठिंबा दिला. त्यांना नक्की काय करायचे होते हे मला सांगता येणार नाही. त्यांनी कशाचीही अपेक्षा न करता पाठिंबा दिला आहे. बघू दोन तीन दिवसांत काय ते स्पष्ट होईल. त्यांनी असा निर्णय का घेतला हे राज ठाकरेच स्पष्ट करु शकतील असेही शरद पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले, अनेक संस्था काम करत असतात, एजन्सीज काम करत असतात त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला का? हे काही मला माहीत नाही. यावेळी पत्रकारांनी पवारांना राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत सामान्य माणसे संभ्रमात आहेत असे शरद पवारांना विचारले असता मी पण सामान्य नागरिक आहे अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.