27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयजम्मू-काश्मीरला मिळेल पूर्ण राज्याचा दर्जा

जम्मू-काश्मीरला मिळेल पूर्ण राज्याचा दर्जा

उधमपूर : आगामी लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी प्रचारासाठी उधमपूरला पोहोचले. याच दरम्यान मोदी म्हणाले की, जम्मू-काश्मीरला त्यांचा राज्याचा दर्जा परत मिळेल आणि केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका होतील ही वेळ दूर नाही. भाजपाने उधमपूरमधून केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना उमेदवारी दिली आहे.

नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात म्हटले की, कमकुवत काँग्रेस सरकारने शाहपूर कंडी धरण १० वर्षे प्रलंबित ठेवले. त्यामुळे जम्मूतील गावे कोरडी पडली होती. काँग्रेसच्या काळात रावीतून बाहेर पडणारे आमच्या हक्काचे पाणी पाकिस्तानात जात होते. जेव्हा लोकांना त्यांचे वास्तव कळले, तेव्हा जम्मू-काश्मीरमध्ये भ्रमाचे मायाजाळ चालणार नाही.

१० वर्षात आम्ही दहशतवादी आणि भ्रष्टाचा-यांवर कारवाई केली आहे आणि आता येत्या ५ वर्षांत या राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे. गेल्या १० वर्षांत जम्मू-काश्मीर पूर्णपणे बदलले आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जम्मू-काश्मीरचे मन बदलत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आता शाळा जाळल्या जात नाहीत, त्या बांधल्या जातात, असे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात म्हटले आहे. त्यांनी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला आहे. कलम ३७० बाबत पंतप्रधान म्हणाले, तुमच्या आशीर्वादाने मोदींनी ३७० चा ढिगारा जमिनीत गाडला आहे. मी काँग्रेसला ३७० परत आणण्याचे आव्हान देतो. जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेसाठी ३७० ची भिंत बांधण्यात आली.

ही निवडणूक म्हणजे देशात मजबूत सरकार बनवण्याची निवडणूक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. एक मजबूत सरकार आव्हानांमध्ये काम करते. आज गरिबांना मोफत रेशनची गॅरंटी आहे. १० वर्षांपूर्वी काश्मीरमधील गावांमध्ये वीज, पाणी आणि रस्ते नव्हते. मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी आहे. आज तुमच्या आशीर्वादाने मोदींनी आपली गॅरंटी पूर्ण केली आहे. आज दहशतवाद, सीमेपलीकडून गोळीबार, दगडफेक हे या निवडणुकीचे मुद्दे नाहीत. देशाच्या कानाकोप-यात पुन्हा एकदा मोदी सरकार हाच आवाज येत आहे असेही नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR