नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सध्या नाशिक मधील सिडको परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आलेले आहेत. अशाच एका बॅनरची शुक्रवारी चर्चा रंगली तसेच त्यामुळं खळबळही निर्माण झाली. परंतू, वेळीच हा बॅनर पोलिसांनी हटवल्यानं परिस्थिती नियंत्रणात आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, शुक्रवारी सिडकोतील पाटील गार्डनच्या प्रवेशद्वाराजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व टिपू सुलतान यांचा एकत्रित फोटो लावण्यात आला होता. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. पण प्रकारामुळं वाद निर्माण होऊ शकतो, हे काही नागरिकांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेत यासंदर्भात अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. यानंतर त्यांनी या घटनेबाबत संबंधित व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे सांगितले