पालघर : विश्वगुरु म्हणता आणि प्रत्येक भाषण उद्धव ठाकरेचा उद्धार केल्याशिवाय यांचं भाषण पूर्ण होत नाही, नकली शिवसेना म्हणता ती तुमची डिग्री आहे का? अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीएम मोदींवर घणाघाती प्रहार केला. पालघरमध्ये जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पीएम मोदी आणि अमित शाह यांनी केलेल्या टीकेवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की, हा भाडखाऊ जनता पक्ष आहे, यांना गाडायचं असेल आत्ताच गाडा, देणार साथ त्याचा करणार घात अशी प्रवृत्ती असल्याचे ठाकरे म्हणाले.
ठाकरे म्हणाले की, इकडे फणा काढून बसतात आणि तिकडे चीनकडे शेपूट घालून फिरतात. तुम्हाला देशात सरकार पाहिजे ना हो की नाही मग तुम्हाला मोदी सरकार पाहिजे की भाजप सरकार पाहिजे पण ते तर जाहिरात करतात. भारत माता माझी माता आहे मोदीजी तुमचे नाव तुमच्या दाराच्या पाठीवर लावा माझ्या देशाच्या पाठीवरती तुम्हाला लावता येणार नाही, तर गोव्याच्या बाहेर लावा नाहीतर गुजरातीत परत गेल्यानंतर तुमच्या दाराच्या बाहेर नाव लावा पण माझ्या देशाच्या सरकारवरती मोदी नाव पुन्हा लावता कामा नये, येता कामा नये. एक माणूस सगळ्यांना गुलाम बनू शकतो? अशी विचारणा त्यांनी केली.