मुंबईतील बिकेसीतील सरकारी कार्यालयाला भीषण आग लागली. निवृत्ती वेतन विभागाच्या कार्यालयाला चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर ही लाग लागली आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
कार्यालयातील अग्निशमन यंत्रणा कार्यन्वयीत केल्यानंतर देखील आग विझत नसल्याने अग्निशमन विभागाला कळवण्यात आलं. अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुंबई पोलीस देखील घटनास्थळी उपस्थीत आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.