सांगोला/ प्रतिनिधी
शेतकऱ्याला विश्वासात न घेता राज्य सरकारने नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ महामार्ग काढल्यामुळे बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा यास विरोध होऊ लागला आहे. शेतकरी कामगार पक्ष व राज्य शेतकरी सभा यांच्या नेतृत्वाखालील गोवा शक्तिपीठ महामार्गाबाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने २८ फेब्रुवारी रोजी जाहीर केलेले आदेश सूचना रद्द करावी व पर्यायी महामार्गाचा उपयोग करून महाराष्ट्रातील देवस्थाने जोडण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. या निर्णयाच्या विरोधात नागपूर ते गोवा बारा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्याच्या एकजुटीसाठी दौरा करण्यात येत असल्याचे भाई दिगंबर कांबळे यांनी सांगितले.
नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या अडीअडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी
तसेच शेतकऱ्याच्या संवादासाठी ११ एप्रिल ते २१ एप्रिल अखेर हा संवाद दौरा असून बाधित क्षेत्राला एकसमान सरसकट किमान दोन कोटी मोबदला मिळावा तसेच एमआयडीसी झोन महापालिका क्षेत्राजवळ ४कोटी मोबदला मिळावा. तसेच बाधित क्षेत्रातील विहिरी, घरे, पाईपलाईन, झाडे, कुपनलिका याची भरपाई चारपट मिळावी.
तसेच रत्नागिरी ते नागपूर हा १६६ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग सध्या अस्तित्वात असताना, विनाकारण कुणाची मागणी नसताना शेतकऱ्याच्या माती राज्य सरकार शक्तिपीठ या नावाने हा मार्ग मारत आहे. त्यामुळे अनेक बागायती जमिनीचे नुकसान होणार आहे व ह्या महामार्गाला आमचा विरोध राहील त्यासाठी हा संपर्क दौरा असल्याचे दिगंबर कांबळे यांनी सांगितले. यावेळी प्रा. राजू गोरडे, शरद पवार, घनश्याम नलवडे, भूषण गुरव, प्रवीण पाटील, सागर बिले, दिलीप खोत, गजानन सावंत, शिवाजी शिंदे, वामन कदम, अमर शिंदे, विष्णू सावंत, राहुल जगदाळे व शेतकरी वर्ग उपस्थित होता.