22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयगोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत ६ जणांचा मृत्यू

गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत ६ जणांचा मृत्यू

हैदराबाद : हैदराबादमध्ये एका अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याचा व्हीडीओ देखील समोर आला आहे. यामध्ये अग्निशमनदलाचे कार्यकर्ते लोकांना वाचवताना दिसत आहेत.

इमारतीच्या खिडकीत शिडी लावून महिला आणि लहान मुलांना वाचवताना दिसत आहेत.
आगीचे स्वरूप इतके भीषण होते की, ती भडकल्यानंतर ती इतक्या वेगाने पसरली की इमारतीतील लोकांना बाहेर पडताही आले नाही. या आगीत एक बाळही अडकून पडले होते, पण त्याला पोलिसांनी सुखरूपरीत्या बाहेर काढले आहे

गोडाऊनला आग
पोलीस उपायुक्त व्यंकटेश्वर राव यांच्या माहितीनुसार, हैदराबादच्या बाजारघाट भागात ही दुर्घटना घडली. यामध्ये ६ रहिवाशांचा होरपळून मृत्यू झाला. इमारतीच्या तळमजल्यावरील गोडाऊनला आग लागल्यानंतर ती वेगाने इमारतीत पसरली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR